top of page
Logo_new-removebg-preview.png
Untitled.png

डॉ. सरोजा भाटे

Untitled.png

डॉ. सरोजा भाटे जन्म - ५ जानेवारी १९४२, स्थळ - पुणे डॉ. सरोजा विद्याधर भाटे, या प्राज्ञपाठशाळामंडळ, वाईच्या सन २००१ पासून विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांचे संपूर्ण शिक्षण पुणे येथे झाले. संस्कृत भाषेची फर्ग्युसन महाविद्यालय व पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर व डॉक्टरेट पदवी त्यांनी प्राप्त केली. सन १९६२ ते २००१ या कालावधीत पुणे विद्यापीठात संस्कृत विभागात कार्यरत होत्या. सन १९८० ते २००१ या कालावधीत पुणे विद्यापीठात संस्कृत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत दहापेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांची पाणिनीय संप्रदाय, महाभाष्य, भर्तृहारीची महाभाष्य दीपिका, वाक्यपदीय, सिद्धान्त कौमुदी ही महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच चाळीसएक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. 


अलीकडेच एप्रिल २०२३ मध्ये सुभाषितरत्नभाण्डागार या संस्कृत सुभाषित असलेल्या पुस्तकाचा मराठीत संक्षिप्त अनुवाद केला आहे. त्याचबरोबर प्रसंगोपात्त विविध वर्तमानपत्रे व मासिकांमध्ये वैचारिक लेख प्रसिद्ध. संस्कृत भाषेतील राष्ट्रीय तसेच आंतररष्ट्रीय परिसंवादामध्ये सहभाग, तसेच अशा परिसंवादांचे आयोजन केले आहे. भारतातील तसेच परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये व संस्थांमध्ये व्याख्याने दिली आहेत. राष्ट्रीय संस्कृत पंडित म्हणून तत्कालिन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सन्मान झाला आहे. संगीतामध्येही त्यांना गती आहे.


पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत मंडळ, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद, अभ्यंकर पाठशाळा पुणे, आनंदाश्रम पुणे, पाणिनी प्रतिष्ठान इ. संस्थांशी त्या निगडित आहेत. संस्थेच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीबरोबरच प्राज्ञपाठशाळामंडळाचा जो मुख्य प्रकल्प धर्मकोश त्याची एकूणच जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात संस्थेचे कार्य पुढे जात असून डॉ. भाटे यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

bottom of page