top of page
Logo_new-removebg-preview.png

मीमांसाकोश

सन १९३१ मध्ये संन्यास घेतल्यानंतरही स्वामी केवलानंद सरस्वती यांनी एका नव्या प्रकल्पाला हात घातला. सतत वीस वर्षे काम करून त्यांनी मीमांसाकोशाची संहिता एकहाती सिद्ध केली. याचे एकूण ६ खंड असून सुमारे ५००० पृष्ठांचा आधुनिक पंडिताने केलेला असा हा मौलिक ज्ञानकोशच आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सन १९५२ मध्ये पहिल्या खंडाचे प्रकाशन वाईमध्ये झाले होते. मीमांसाकोशाच्या सहाव्या खंडाचे प्रकाशन थोर विचारवंत आणि भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌‍‍ यांनी सन १९६२ मध्ये वाईमध्ये केले.

bottom of page